Explore

Search
Close this search box.

Search

November 8, 2024 12:52 am

MPC news

Talegaon Dabhade: जिजामाता चौकातील स्वच्छतागृह कायमस्वरूपी हटवण्याची मागणी

एमपीसी न्यूज- तळेगांव दाभाडे शहरातील भर रहदारीच्या रस्त्यावरील जिजामाता चौकात असणारी बस स्टॉप शेजारील मुतारी बऱ्याच वर्षापासून पडून आहे. तिथे काही मद्यपी मद्यपान करतात. याबाबत स्थानिक नागरिकांनी, दुकानदारांनी, व्यापारी वर्गाने प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. हे शौचालय तात्काळ कायमस्वरूपी हटवावे, अशी मागणी नागरिकांनी (Talegaon Dabhade) केली आहे.

तळेगांव दाभाडे शहर येथील भर रहदारीच्या रस्त्यावरील जिजामाता चौकात असणारी बस स्टॉप शेजारील मुतारी बऱ्याच वर्षापासून पूर्णपणे बिनकामाची व वापरण्यास उपयुक्त नाही त्याचा वापर फक्त आणि फक्त मद्यपी करताना दिसत आहे.असे असतानाही आजूबाजूच्या नागरिकांनी, दुकानदारांनी वारंवार तक्रार करूनही कोणताही विभाग ह्या वापरावीना खराब स्थितीत असलेल्या मुतारीची कोणत्याही प्रकारे विल्हेवाट(Talegaon Dabhade) लावण्यासाठी मानसिकता दाखवत नाही.

 

Talegaon Dabhade :शहरात ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच मद्यपींवर कारवाईची मागणी

दुकानदार व नागरीक वेळेवर सर्व प्रकारचे कर भरत असतो त्यांना अशा प्रकारे घाणीच्या साम्राज्यात बघताना संबधित विभागाला काही कसे वाटत नाही? तरी संबधित मुतारी जमीनदोस्त करून त्या भागातून जाण्या-येणाऱ्या विद्यार्थी-शिक्षक, नागरिकांना, दुकानदारांना, प्रवाशांना घाणीच्या साम्राज्यातून मुक्त करावे.

शेजारीच असलेल्या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स मधील सार्वजनिक शौचालय सर्वाँना सर्व सोयीयुक्त वापरण्यासाठी आहेच.आता तर भर पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी आणि चिखल साचून आजू बाजूच्या परीसरात डेंग्यूसारख्या आजाराला आमंत्रण देण्याचा प्रकार सुरू असणार ह्यात काडी मात्र शंका नाही. त्यामुळे ह्या त्रासापासून सुटका करून कायमस्वरूपी मुतारी हटवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर