एमपीसी न्यूज – वाकड परिसरात वाहन तोडफोडीच्या घटनांचे सत्र (Wakad)सुरूच आहे. वाकड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड झाली आहे. तापकीर चौक, काळेवाडी येथे दोघांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना रविवारी (दि. 14) मध्यरात्री घडली आहे.
तापकीर चौकातील कौतिक हॉटेल समोर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड झाली. नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केली होती. दरम्यान दोघांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. यामध्ये एका मालवाहतूक टेम्पोचा ही समावेश आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांच्या तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत.
ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे 10 जुलै रोजी एका टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी अंशु जॉर्ज किलिंगकर (वय 23), आर्यन रमन पवार (वय 19, दोघेही रा. काळेवाडी) आणि करण रवी पटेकर (वय 25, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोडफोड का करता, असे विचारणाऱ्या एका व्यक्तीला आरोपींनी लुटले होते.