- कांदा व बटाट्याचे दर स्थिर
- पालेभाज्यांचे भाव गडगडले.
- चाकण बाजारभाव – रविवार, दि. 14 जुलै, 2024
एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव गडगडले. कांदा व बटाटा यांचे भाव स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारात टोमॅटो, दोडका, कारली, वांगी, शेवगा, कोबी, फ्लॉवरची आवक वाढली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व पालक भाजीची प्रचंड आवक झाली. जनावरांच्या बाजारात गाई, म्हैस व शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 4 कोटी 10 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1000 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 50 क्विंटलने घटली; मात्र कांद्याचा कमाल भाव 3 हजारांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 2500 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने वाढली व बटाट्याचा कमाल भाव 3000 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 17 हजार रुपयांवरून 18000 रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 375 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 1000 क्विंटल.
- भाव क्रमांक – 3000 रुपये
- भाव क्रमांक – 2500 रुपये
- भाव क्रमांक – 2000 रुपये
बटाटा – एकूण आवक – 2500 क्विंटल
- भाव क्रमांक 3000 रुपये
- भाव क्रमांक 2700 रुपये
- भाव क्रमांक 2500 रुपये
फळभाज्या
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
- टोमॅटो – 250 क्विंटल (4000 ते 6000 रू. )
- कोबी – 180 क्विंटल ( 2500 ते 3000 रू.)
- फ्लॉवर – 190 क्विंटल ( 1500 ते 2000रु.)
- वांगी – 95 क्विंटल ( 1500 ते 2500 रु.)
- भेंडी – 72 क्विंटल (3000 ते 5000 रु.)
- दोडका – 63 क्विंटल ( 5000 ते 6000 रु.)
- कारली – 74 क्विंटल ( 4000 ते 5000 रु.)
- दुधीभोपळा – 65 क्विंटल (1000 ते 2000 रु.)
- काकडी – 97 क्विंटल ( 1000ते 1500 रु.)
- फरशी – 43 क्विंटल ( 7000 ते 9000 रु.)
- वालवड – 38 क्विंटल ( 7000 ते 9000 रुपये)
- ढोबळी मिरची – 170 क्विंटल ( 4000 ते 6000 रु.)
- चवळी – 28 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.)
- शेवगा – 51 क्विंटल ( 7000 ते 8000 रु.)
- गाजर – 115 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.)
- गवार – 60 क्विंटल (5000 ते 7000 )
पालेभाज्या
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
- मेथी – एकूण 20 हजार 450 जुड्या ( 500 ते 1000 रुपये,)
- कोथिंबीर – एकूण 29 हजार 500 जुड्या ( 400 ते 800 रुपये,)
- शेपू – एकूण 4 हजार 750 जुड्या ( 500 ते 1000 रुपये )
- पालक – एकूण 4 हजार 800 जुड्या ( 600 ते 1000 रुपये),.
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या
- 35 जर्शी गाईपैकी 20 गाईची विक्री झाली ( 10,000 ते 40,000 रु.)
- 90 बैलांपैकी 70 बैलांची विक्री झाली ( 10,000 ते 40,000रु.)
- 110 म्हशीपैकी 85 म्हशींची विक्री झाली.( 20,000 ते 80,000रु.)
- 12 हजार शेळ्या – मेंढ्यापैकी 10,700 शेळ्यांची विक्री झाली ( 2000ते 15,000 रु.)