Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 11:01 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Chakan : पावसाने पालेभाज्या मातीमोल

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मेथी- कोथिंबीरीचा दर अवघ्या ५ रूपयांवर आला आहे. सकाळपासून होत असलेल्या पावसाने पालेभाज्यांची मोठी आवक बाजारात झाली; आणि दरात मोठी घसरण झाली आहे.

मेथी-कोथिंबीरला चाकण मधील किरकोळ बाजारात 5 ते 10 रुपये जुडी , तर घाऊक बाजारात 2 ते 5 रुपयांपर्यंत जुडी मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या मते मागील महिन्याच्या तुलनेत सध्या कोंथिबीरचे उत्पादन दुपटीने वाढले आहे. अचानक पडलेल्या कोंथिबीरच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

छाया : अविनाश दुधवडे, चाकण

शेतकऱ्यांनी कोंथिबीरीचे उत्पादन परवडत नसल्याने भाज्या शेतात सोडून देणार असल्याचे सांगितले आहे.  भाजीपाला पावसात भिजल्याने त्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे अडते व व्यापार्यांनी सांगितले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर