Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 6:41 am

MPC news

Chakan: मारहाण केल्‍याप्रकरणी रिक्षा चालकास अटक

एमपीसी न्यूज – अचानक रिक्षा का थांबविली, असा जाब विचारल्‍याने (Chakan)रिक्षा चालकाने दोन जणांना मारहाण करून जखमी केले. ही घटना चाकण येथे रविवारी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास घडली.

तुषार सुरेश पिसाळ (वय 38 रा. बागडे वस्‍ती, कुरूळी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रथमेश ऊर्फ सोन्‍प्‍या राजेंद्र मोरे (वय 23 रा. कडाचीवाडी, चाकण) याला अटक केली आहे.

IAS Pooja Khedekar : महाविद्यालयाच्या कागदपत्रावरून पूजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी तुषार हे चाकण येथील मासे विक्री मार्केटपासून दुचाकीवरून चालले होते. त्‍यावेळी आरोपी मोरे याने अचानक रिक्षा फिर्यादी यांच्‍या दुचाकीसमोर आणून थांबविली. याबाबत तुषार याने जाब विचारला असता आरोपी मोरे याने फिर्यादी तुषार व त्‍यांच्‍या मित्राला हातातील कड्याने मारून जखमी केले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर