Explore

Search
Close this search box.

Search

November 8, 2024 12:12 am

MPC news

Pune : पुण्यात रविवारी पावसाच 19 झाडपडीच्या घटना

एमपीसी न्यूज –  पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी  (दि.14) सायंकाळपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात 19 ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

शहर परिसरात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीनंतर शहरात मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला. रविवारी दिवसभरात वेगवेगळ्या भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कोथरुड परिसरातील एमआयटी महाविद्यालयाजवळ, कोंढव्यातील एन आयबीएम रस्ता, गंज पेठ, हडपसर भागातील 15 नंबर चौक, कोथरुड बस डेपो, पाषाण, जनवाडीतील अरुण कदम चौक, प्रभात रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वडारवाडी, कसबा पेठ, बिबवेवाडी, पाषाण येथील वीरभद्रनगर, कोथरुडमधील सुतार दवाखाना, महंमदवाडी, नऱ्हे अभिनव काॅलेजजवळ, मुकुंदनगर, विश्रांतवाडी भागात झाडे कोसळली.

झाडे कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले.

SUBSCRIBE TO MPCNEWS YOUTUBE CHANNEL

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर