एमपीसी न्यूज – ससून रुग्णालय, वार्ड क्रमांक दोनमध्ये रविवारी (दि.14) सकाळी अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी ही जखमी झालेले नाही.
आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून कसबा अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन तातडीने रवाना करण्यात आले होते.
Pune : घरफोडीचा तब्बल पावणे अठरा लाखांचा ऐवज ठेवला मेट्रो स्टेशनच्या जिन्याजवळ
आग लागताच तेथील कर्मचाऱ्यांनी सदर खोलीचा दरवाजा उघडून प्राथमिक उपाय म्हणून तीन अग्निरोधक उपकरण वापरुन आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. दलाचे जवान पोहोचताच त्यांनी सर्व परिस्थिती हाताळत आग पुर्ण विझवून धोका दुर केला. या आगीमध्ये संगणक, टेबल, खुर्ची, मॉनिटर, प्रिंटर, फॅन, राऊटर असे व इतर साहित्य जळाले. घटनेच्या वेळी तेथील रुग्ण शेजारील वार्ड मध्ये हलविण्यात आले होते. या घटनेत जखमी व जिवितहानी झाली नाही. ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या कामगिरीत वाहनचालक समीर शेख व तांडेल संजय गायकवाड आणि फायरमन शंकर वाबळे, शुभम देशमुख यांनी सहभाग घेतला.