एमपीसी न्यूज: पहिल्यावहिल्या इव्हज् सुपर लीग फुटबॉल स्पर्धेची पुणे शहरात मोठी उत्सुकता आहे. 16 वर्षांखालील मुलींसाठीच्या फाईव्ह ए साईड फॉरमॅटमधील लीगसाठी चांगली बक्षिसे ठेवण्यात(Pune) आली आहेत.
युवा क्रीडा क्षेत्रातील एका उल्लेखनीय लीगच्या माध्यमातून युवा महिला खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासह त्यांच्यात खिलाडूवृत्ती आणि स्पर्धेची भावना वाढवण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.इव्हज् सुपर लीगकडे केवळ स्पर्धा म्हणून नाही तर युवा खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देतानाच 16 वर्षांखालील मुलींना त्यांचे फुटबॉल कौशल्य दाखविण्यासाठीचे एक दर्जेदार व्यासपीठ ठरावे, असा आयोजकांचा उद्देश आहे. खेळांमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासह मुलींमध्ये निरोगी, सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यादृष्टीनेही या स्पर्धेचे आयोजन करण्यात(Pune) आले आहे.
PCMC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईनही अर्ज भरून घेणार
इव्हज् सुपर लीगच्या उद्घाटनीय आवृत्तीत 8 संघांचा सहभाग असून प्रत्येक संघ किमान 14 सामने खेळेल. फाईव्ह ए साईड फॉरमॅटमधील या लीगचे सामने फक्त वीकेंडला खेळवले जातील.इव्हज् सुपर लीगमध्ये अशोका फुटबॉल क्लब, इव्हस फुटबॉल अकॅडमी, स्निग्मय पुणे फुटबॉल क्लब, ज्युनियर्स फुटबॉल क्लब, केएमपी अॅस्पायर, स्नायपर स्पोर्ट्स अकॅडमी, पॉवरपफ गर्ल्स, संगत फुटबॉल क्लब या आठ संघांचा समावेश आहे..
या लीगला ऑनवर्ड टेक्नॉलॉजिस (पॉवरिंग पार्टनर), श्री गोकुलम (असोसिएट पार्टनर), इक्विटास बँक (बँकिंग पार्टनर), हाउस ऑफ जर्सी (किट पार्टनर), एस.एस. रॉय अँड असोसिएट्स (ट्रॉफी पार्टनर), अकिझर (बेव्हरेज पार्टनर), मंकी आईस (आयसिंग पार्टनर) , स्काय जम्पर ट्रॅम्पोलिन पार्क (एंटरटेनमेंट पार्टनर), शायनिंग कुलाबा अकॅडमी, रायझिंग यंग स्टार्स, सिटी एफसी पुणे (गुडविल पार्टनर्स), फिरोज हॉकी (गिफ्ट पार्टनर), पर्पल वँड फाऊंडेशन, सारथ्या फाउंडेशन (फाऊंडेशन पार्टनर) तसेच एनआयईएम- द इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट (नॉलेज पार्टनर) यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
इव्हज् सुपर लीगबद्दल:
फुटबॉलमधील तरुणांच्या सहभागाला आणि विकासाला चालना देण्यासह पुण्याच्या स्पोर्ट्स कॅलेंडडरमधील वार्षिक वेळापत्रकातील एक स्पर्धा बनण्याचे इव्हज् सुपर लीगचे उद्दिष्ट आहे. या लीगच्या माध्यमातून मुलींसाठी सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यावर या स्पर्धेचा भर आहे.