एमपीसी न्यूज – मागील दोन वर्षांपासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांवर कारवाई केली जात (Pune)आहे. या वर्षी देखील ही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच शासनाच्या आवश्यक परवानग्या घेतल्याशिवाय शाळा सुरू करण्यास परवानगी मिळत नाही. अशा शाळा अनधिकृत ठरल्या जातात. जिल्हाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. आता यामध्ये 49 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.
PCMC : महापालिका शहरात लावणार 1 लाख बांबू
पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळा
किड्जी स्कूल, (शालीमार चौक, दौंड, जि. पुणे)
जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास (कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे)
यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल (सोनवडी, ता. दौंड, जि. पुणे)
ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, (उंड्री, ता. हवेली, जि.पुणे)
नारायणा इ टेक्नो स्कूल (वाघोली, ता. हवेली, जि. पुणे)
द गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल (ता. हवेली, जि. पुणे.)
फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल (मांजरी बु., ता. हवेली, जि. पुणे.)
इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल (फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे. इ. 6 वी ते इ. 8 वी वर्ग अनधिकृत),
व्ही. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल (भेकराईनगर, ता. हवेली, जि. पुणे)
द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल (कदम वाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे)
रामदास सिटी स्कूल रामदरा (लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे)
मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल (कदम वाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे)
श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय (कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे)
शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल (जांभुळवाडी, ता. हवेली, जि. पुणे)
भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (मोई, ता. खेड, जि. पुणे),
जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल (खामशेत, ता. मावळ, जि. पुणे)
श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर (गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे)
व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, (नायगांव, ता. मावळ, जि. पुणे)
किंग्ज वे पब्लिक स्कूल, (रायवूड, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे)
रुडिमेन्ट इंटरनॅशनल स्कूल (माण तालुका मुळशी, जि. पुणे)
एंजल इंग्लिश मीडियम हायस्कूल (गणेश नगर दत्तवाडी नेरे तालुका-मुळशी, जि. पुणे)
चाणक्य ज्युनिअर कॉलेज (पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे)
महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल (खुबवली, ता. मुळशी, जि. पुणे)
अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल (ता. मुळशी, जि. पुणे)
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल (पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे)
इलाईट इंटरनॅशनल स्कूल (ता. मुळशी, जि. पुणे)
संस्कार प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल (ता. मुळशी, जि. पुणे)
श्रीविद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल (घोटावडे फाटा पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे)
पोदार इंटरनॅशनल स्कूल (ताथवडे ता. मुळशी जि. पुणे (सीएआई), ता. मुळशी)
एलप्रो इंटरनॅशनल स्कूल (हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे)
माउंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल (नेरे, ता. मुळशी, जि. पुणे)
दिल्ली पब्लिक स्कूल (हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे)
सरस्वती विद्या मंदिर (पिरंगुट, ता. मुळशी)
श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर, ता. पुरंदर, जि. पुणे),
दारुल मदिना एज्युकेशन फौंडेशन मुंबई संचलित दारुल मदिनाह स्कूल,( पारघेनगर,कोंढवा खु. पुणे (इंग्लिश)
तकवा एज्युकेशन ट्रस्ट संचलित टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, कोंढवा खु. पुणे (इंग्लिश)
सेवा फौंडेशन पुणे संचलित लेगसी हायस्कूल (अश्रफ नगर कोंढवा बु.पुणे)
केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कूल (महंमदवाडी रोड पुणे)