एमपीसी न्यूज – पोलीस तपासणीच्या नावाखाली एका महिलेची 56 हजार 200 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना वाकड येथे शनिवारी(Wakad) (दि. 13) घडली.
वाकड येथे राहणाऱ्या एका 34 वर्षीय महिलेने याबाबत रविवारी (दि. 14 ) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7058643318, 9713289689 या मोबाइल धारक व आरबीआय आणि आयसीआयसीआय बँक क्रमांक नंबर 679405601883 यांच्याविरोधात(Wakad) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादीला यांना फोन आला. आपण फेडेक्स कुरिअर ऑफिस, मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितले. मुंबईहून लंडनला पाठविण्यासाठी तुमचे पार्सल आहे आहे. ते व्हेरिफाय करण्याच्या नावाखाली मुंबई गुन्हे शाखेत फोन जोडत असल्याचे सांगितले. पोलीस तपासाच्या नावाखाली फिर्यादी यांना ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. तुमचे आधारकार्ड अवैध असून तुमच्या बँकेतील रक्कमही अवैध असल्याचे सांगितले. तुमच्या खात्यात किती रक्कम आहे हे पाहण्यासाठी फिर्यादी यांना खात्यावरील 5 हजार 200 रुपयांची सर्व रक्कम आरोपींनी आपल्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.