एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या(Dehugaon) अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठू नामाच्या गजरात ‘अभंग पालखी सोहळा’ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
इ. तिसरी ते सहावी तील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. दिंडीमधील वर्गांना इयत्ता व तुकडी नुसार दिंडी क्रमांक देण्यात आले होते. तसेच पाठांतरासाठी एक एक अभंग देण्यात आला होता. दिंडीतील या विठूरायाच्या भक्तांनी भक्तिरसात चिंब भिजून अभंगाचा गजर करत पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. दिंडीमध्ये अभंगांबरोबरच पर्यावरण संवर्धनावर आधारित घोषवाक्ये बोलत विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. इ. पाचवीतील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यानिमित्त वारीची पार्श्वभूमी समजावून सांगितली.
इ. सहावीतील विद्यार्थ्यांनी ‘विठूचा गजर’ या गाण्यावर पावले खेळून टाळनाद केला. इ. तिसरी व चौथी तील विद्यार्थ्यांनी फुगडीचा फेर धरला. शिक्षक ही फुगडीवर फेर धरत या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या हस्ते श्री विठ्ठल, संत ज्ञानेश्वर व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची आरती करण्यात आली.
Pune : पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी होणार,इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा
इ. पहिली व दुसरीतील विद्यार्थी दिंडीत सहभागी होऊन अभंग पालखी सोहळ्यात रममाण झाले होते. सोमवार, दि. 15 जुलै रोजी पूर्व प्राथमिक विभागाचा अभंग पालखी सोहळा संपन्न झाला. दिंडी सोहळ्याची सांगता संत तुकोबारायांच्या विनवणी व माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली.