एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील एकमेव गाव कार्यक्षेत्र (Maval)असलेली सर्वात जुन्या पुसाणे विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी समिता अरुण वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक भिमाजी रावडे यांची निवड करण्यात आली. वाजे यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या कार्यकाळात अध्यक्षपदी पहिल्यांदा एका महिलेला संधी मिळाली आहे.
मावळते अध्यक्ष काळुराम वाजे, उपाध्यक्ष राजु जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सहाय्यक निबंधक कार्यालय वडगाव येथे निवडणुक घेण्यात आली. यावेळी वाजे आणि रावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी आर के निखारे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषीत केली. सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव बाळासाहेब सावंत यांनी काम पाहिले.
Pune : वैद्यराज रमेश नानल यांची शुक्रवारी मुलाखत
यावेळी सोसायटीचे संचालक, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बाजीराव वाजे, संचालक गोरख काशिराम वाजे, सुखदेव वाजे, संजय वाजे, दत्तात्रय वाजे, आनंदा वाजे, दिनेश वाजे आदी उपस्थित होते.