एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या बसला अपघात झाला. बस आणि ट्रॅक्टरची धडक बसली. यामध्ये बस रस्त्याच्या बाजूला उलटली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
डोंबिवलीच्या केळझर गावातून भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. नवी मुंबई येथे बस आणि ट्रॅक्टरची धडक बसली. त्यामध्ये बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडली. या अपघातात 42 जण जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
Today’s Horoscope 16 July 2024 : आजचे राशीभविष्य
या अपघातामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढली. तीन तासानंतर लेन वरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.