एमपीसी न्यूज : प्राचीन संहिता गुरुकुल, केशायुर्वेद व कायायुर्वेद या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिग्गजांच्या मुलाखती’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी (दि. 19 जुलै) ज्येष्ठ वैद्यराज रमेश नानल यांची मुलाखत होणार आहे. वैद्यराज नानल यांच्याकडून आयुर्वेद अभ्यासकांसाठी अनेक अनमोल आठवणींचा व शिकवणीचा अजोड खजिना उलगडणार(Pune) आहे.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुलच्या आवारातील गणेश सभागृहात शुक्रवारी दुपारी 2 ते 5 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी वैद्यराज नानल यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, नवोपक्रमाची घोषणा व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वैद्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विनामूल्य आहे, असे वैद्य हरीश पाटणकर यांनी कळविले(Pune) आहे.