Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 11:12 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Pune : पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी होणार,इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा

एमपीसी न्यूज : पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून केंद्र सरकारला त्याबाबतचा सखोल अहवाल सादर करणार आहेत. त्यासाठी आयकर विभागाकडून खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची माहिती आणि त्यांच्या आई – वडीलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागविण्यात आलेली आहे.  त्याचबरोबर स्वतः पुजा खेडकर यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मागविण्यात आलेली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ही माहिती जमा करायला सुरुवात(Pune) केलेली आहे.

वादग्रस्त पूजा खेडकरांच्या प्रकरणाची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सध्या .अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी  चौकशी करत आहेत. या चौकशी समितीला स्थानिक प्रशासनाकडून सगळी माहिती दिली जाणे अपेक्षीत आहे. त्याच संदर्भात अहमदनगरचे जिल्हाधिकारी चौकशी करत आहेत.

पूजा  खेडकरांचे आई वडील जरी एकमेकांपासून विभक्त झाल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यात आले असले तरी दोघांचे उत्पन्न हे तपासले जात आहे. तसेच,  पूजा खेडकरांच्या नावावर देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्या मालमत्तेपासून त्यांना उत्पन्न देखील मिळते. हे सर्व तपशील पूजा खेडकरांनी आयकर विभागाकडे दाखल केलेल्या आयटीआरमधून समोर आले आहेत. ही सर्व माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकऱ्यांकडून गोळा केली(Pune) जात आहे.

Maval : मावळ गोळीबार प्रकरण; तळेगाव येथे झालेल्या आंदोलनातील 20 जण निर्दोष

जिल्हाधिकाऱ्यांकडून गोळा करण्यात आलेली माहिती केंद्र सरकारची जी चौकशी समिती आहे त्यांना सोपवण्यात येणार आहे. त्यातून पूजा खेडकर  यांनी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळवले ते खर होतं का? दुसरीकडे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवत आहेत तर आयटीआर भरताना दाखवलेल्या उत्पन्नांचे काय करायचे या सगळ्या प्रश्नांची सखोल चौकशी होणार आहे. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत साडेतीन तास चर्चा झाली झाल्याची समजते,

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर