एमपीसी न्यूज – 71 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात पुरुष विभागात पुणे शहर, परभणी, रायगड, अहमदनगर या संघानी विजय(Pune) मिळविले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथील बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असो. यांच्या संयुक्तविद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, बाणेर, येथे 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पुरुष व महिला गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी ‘सतेज करंडक’ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ड गटात पुणे शहर संघाने नांदेड संघावर 47-34 अशी मात केली. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे 28-17 अशी आघाडी होती. पुे शहर संघाच्या सुनिल दुबिले व मनोज बोंद्रे यांनी सुरेख खेळ करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. नांदेडच्या शक्ती शेडमाडे, अजय राठोड यांनी काहिसा प्रतिकार केला. तर सौरभ राठोड यांने पकडी घेतल्या.
Pimpri : मोठी बातमी – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला राजीनामा
ब गटात रायगड संघाने सोलापूर संघावर 59-17 असा विजय मिळविला. मध्यंतराला रायगड संघाकडे 35-5 अशी भक्कम आघाडी होती. वैभव मोरे व अनुराग सिंग यांनी चौफेर चढाया करीत आघाडी घेतली. सुमित पाटील व राकेश गायकवाड यांनी पकडी घेतल्या. सोलापूरच्या कुमार चव्हाण, अनिकेत वाघमारे यांनी काहीसा प्रतिकार केला तर प्रफुल कांबळे व बाळु व्हरांडे यांने पकडी घेतल्या. क गटात परभणी संघाने उस्मानाबाद संघावर 46-26 अशी मात केली. मद्यंतराला परभणी संघाकडे 29-14 असी आघाडी होती.
परभणी संघाच्या राहुल लांडगे व गलिव शेख यांनी सुरेख खेळ केला. रत्नाकर घाडगे याने पकडी घेतल्या. उस्मानाबाद सुरेश शिंदे व सुरज पवार यांनी चांगला खेळ केला. तर संदिप मगर याने पकडी घेतल्या. ब गटात अहमदनगर संघाने ठाणे शहर संघावर 33-20 अशी मात करीत आपल्या गटात विजय मिळविला. मद्यंतराला अहमदनगर कडे 13-11 अशी दोन गुणांची आघाडी होती. अहमदनगरच्या सौरभ राऊत याने सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. तर शंकर गदई याने चांगल्या पकडी केल्या. ठाणे शहरच्या अक्षय मकवाना व रोहन टोपारे य़ाने चांगला खेळ केला. क गटात अत्यंत अटितटीच्या झालेल्या गटातील सामन्यात पिंपरी चिंचवड व उपनगर पुर्व यांच्या सामना निर्धारित वेळेत 29-29 असा समान गुणांवर संपला, त्यामुळे दोन्ही संघाना एक एक साखळी गुण देण्यात आला.
पिंपरी चिंचवड संघाकडे 18-12 अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या विशाल ताटे, आदिच्य चौगुले याने जोरदार खेळ केला. तर गौरव तापकीर याने पकडी घेतल्या. उपनगर पुर्व आर्यवर्धन नवले याने आक्रमक खेळ केला. अक्षय बर्डे याने पकडी घेतल्या. अ गटात मुंबई शहर पश्चिम संघाने पालघर संघावर 37-34 असा विजय मिळविला, मध्यंतराला शहर पश्चिम संघ 12-17 असा पिछाडीवर होता. शहर पश्चिम संघाच्या अक्षयकुमार सोनी व सुशांत साईल यांनी आक्रमक खेळ केला. सिध्देश तटकरे व विनोद अत्यालकर यांनी पकडी घेतल्या. सायंकाळच्या सत्रात इ गटात झालेल्या सामन्यात रत्नागिरी संघाने नासिक शहर संघावर 28-22 असा विजय मिळविला. मद्यंतराला रत्नागिरी संघाकडे 17-11 अशी आघाडी होती. रत्नागिरी संघाच्या ओमकार कुंभार, अभिषेक भोजने यांचे चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळविला. साईराज कुंभार व अथर्व धुमाळ यांनी पकडी घेतल्या. नासिक ग्रामीणच्या ईश्वर पाठारे व ऋषिकेश गदख यांनी चांगला प्रतिकार केला. भूषण सानप याने पकडी केल्या. इ गटात झालेल्या दुसऱ्या सामन्यात नंदुरबार संघाने जळगाव संघाचा 47-16 असा धुव्वा उडवित विजय मिळविला. मध्यंतराला नंदुरबार संघाकडे 26-5 अशी आघाडी होती. नंदुरबारच्या वरूण खंडागळे याने उत्कृष्ट चढाया केल्या. तर जयेश महाजन व विवेक राजगुरू यांनी पकडी घेतल्या. जळगावच्या रोहित गोसावी व कुणाल सोनवणे यांनी चांगला खेळ केला.
फ गटात मुंबई उपनगर पश्चिम संघाने धुले संघावर 49-30 अशी मात केली. मध्य़ंतराला उपनगर पश्चिम संघाकडे 27-16 अशी आघाडी होती. उपनगर पश्चिमच्या सुदेश शेलार याने वेगवान चढायांचा खेळ केला. तर केतन कालवणकर याने पकडी घेतल्या. धुळ्याच्या अक्षय पाटील व अविनाश पाटील यांनी चांगला प्रतिकार केला.
फ गटात ठाणे ग्रामीण संघाने सिंधुदुर्ग संघावर 59-18 अशी दणदणीत मात केली. मद्यंतराला ठामे ग्रामीम संघाकडे 26-10 अशी आघाडी होती. ठाणे ग्रामीणच्या असलम इनामदार व राजू कथोरे यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. तर अतुल देसले व अक्षय भोईर यांनी पकडी केल्या. सिंधुदुर्गच्या कौस्तुभ सिंगनाथ व शांताराम साटेलकरयांनी चढाया केल्या तर विग्नेश हांडे व संकेत गोसावी यांनी पकडी केल्या.
मुंलींच्या पुणे लीग स्पर्धेत सिंहगड हवेली संघाने लयभारी पिंपरी चिंचवड संघावर 35-26 अशी मात केली. मध्यंतराला सिंहगड हवेली संघाकडे 15-14 निसटती आघाडी होती. सिंहगड हवेलीच्या आरती मेमाणे, जोया पिंजारी यांनी चौफेर चढाया करीत जोरदार खेळ केला. शोभा खैरे हिने चांगल्या पकडी घेतल्या. लयभारी पिंपरी चिंचवडच्या नेहा चव्हाण व पुजा तेलंग यांनी चांगला खेळ केला. तर माहेश्वरी वाघ हिने पकडी केल्या. वेगवान पुणे संघाने झुंजार खेड संघावर 31-27 असा विजय मिळविला. मध्यंतराला वेगवान पुणे संघ 11-17 पिछाडीवर होता. वेगावन पुणे संघाच्या प्रज्ञा कासार हिने आक्रमक खेळ केला. तर साक्षी गावडे हिने पकडी केल्या. झुंजार खेड संघाच्या साक्षी राबडे हिने जोरदार प्रतिकार केला. अपुर्वा ढमाले हिने सुरेख पकडी केल्या.