Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 5:58 am

MPC news

Pune : गरवारे पुलावरून भरधाव गाडी दुभाजक तोडून पडली खाली, चालकाला किरकोळ दुखापत

एमपीसी न्यूज – पुण्यातील डेक्कन परिसरातील गरवारे पुलावर भरधाव वेगाने आलेली गाडी थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. सुदैवाने पुलाची खोली जास्त नसल्याने चालक किरकोळ जखमी झाला. ह अपघात आज ( मंगळवार) पहाटे 3 वाजता(Pune) घडला.

 

IAS Puja Khedkar : पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; आयकर विभाग करणार खेडकर कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी

प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 3 वाजता हा अपघात घडला. चालक भरधाव वेगात जंगली महाराज रस्त्यावरून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याकडे जात असताना गरवारे पुलाजवळ आल्यावर त्याचे गाडीवर चे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून थेट खाली कोसळली. रात्रीची वेळ असल्याने खाली असेलल्या “सब वे” मध्ये कोणी नव्हते म्हणून जीवितहानी झाली नाही. दुभाजकाला दिलेली धडक इतकी जोरात होती की गाडीची एअरबॅग सुद्धा  आली.गाडीतील ड्रायव्हरची ओळख पटली नाही. या गाडीतील चालकाने मद्यप्राशन केले होता का, अशी शंका आता उपस्थितीत(Pune) केली जात आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर