एमपीसी न्यूज – केअर टेकरनेच 10 गुंठे जागा बळकावली आहे. हा सारा प्रकार राहणे येथील गट क्रमांक 17/3 अ व गट क्रमांक 17/3 ब येथे 24 डिसेंबर 2019 पासून सुरू होता.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी सुरेश शंकर जूनावणे (वय 52 रा. औंध) याला अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्यात आनंद श्रीनिवास हिरेकातुर (वय 53 रा.पाषाण) यांनी फिर्यादी दिली आहे.
Pavana Dam Update: पवना धरणात 34 टक्के पाणीसाठा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीला त्यांच्या वडिलांनी रहाटणी येथील गट क्रमांक 17/3 अ व गट क्रमांक 17/3 ब येथे दहा गुंठे जागा दिली होती. यासाठी आरोपी सुरेश जुनावणे याला केअर टेकर म्हणून नेमण्यात आले होते. मात्र जूनावणे याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करत त्या जागेची खोटी कागदपत्रे बनवून व खोट्या सह्या देऊन जागा स्वतःच्या नावावर असल्याचे दाखवले. तसेच जागेचा अनधिकृत ताबा घेत तेथे स्वतःच्या नावाचा बोर्ड लावून फिर्यादी यांची फसवणूक केली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.