एमपीसी न्यूज – आज दिनांक 17 जुलै (बुधवार) पहाटे 3.30 च्या सुमारास आळंदी पोलिस स्टेशन कडून धानोरे येथे आग लागल्याची माहिती आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलास मिळाली. सदर माहिती प्राप्त होताच तत्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली परंतु आगीच रुद्र पहाता PMRDA व PCMC अग्निशमन दलांना देखील पाचारण कऱण्यात आले.
सदर आग ही मरकळ रोड,धानोरे फाटा येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीत लागली होती व कंपनीमध्ये आगी दरम्यान स्फोट होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरत होती. परिणामी अग्निशमन दलांकडून लिक्विड फोमचा करून आग आटोक्यात आणली गेली.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. सदर आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा
आग विझविण्यात आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या विनायक सोळंकी, प्रसाद बोराटे,पदमाकर श्रीरामे,अक्षय त्रिभुवन,कोळपे तुळशीराम या कर्मचाऱ्यांनी तसेच PMRDA व PCMC अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.घटनास्थळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके स्वतः इतर अधिकारी,कर्मचारी समवेत उपस्थित होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले केमिकल व इतर सर्व बाबींचा पुढील तपास पोलीस करत आहेत.