एमपीसी न्यूज – दिनांक १४ जुलै रोजी एम आय टी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना तसेच संस्कार प्रतिष्ठानच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कोयाळी वन विभाग येथे 200 पेक्षा जास्त वृक्षाचे रोपण करण्याचा आले. विद्यार्थ्यांना वन विभागातील अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण कसे करायचे याची माहिती दिली. पर्यावरण वाचवण्या संदर्भात जोरदार घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण सुरू केले.
वरून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीची तमा न बाळगता विद्यार्थ्यांना वृक्षारोपण पूर्ण केले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम आटोपून वन विभागाच्या नर्सरी मध्ये संस्कार प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या वन भोजनाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांनी त्यांना आलेल्या अनुभवातून व्यक्त केली.
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा
मराठवाड्यातून येऊन आपल्या येथे शिक्षण घेणाऱ्या कृष्णा या विद्यार्थ्याने आता तो त्याच्या गावी काही झाडे लावून त्यांचे संगोपन नक्की करणार हा विश्वास आजच्या वृक्षारोपणाचा निमित्ताने व्यक्त केला. या कार्यक्रमास डॉ. पद्मावती उंडाळे, महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी पल्लवी महागावकर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी अरविंद वागस्कर यांचे मोलाचे योगदान लाभले.
हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे सरांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. मोहन गायकवाड आणि संस्कार प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून करण्यात आला.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.