एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत(Chakan) एका मोकळ्या जागेत लहान बाळाची कवटी आढळली आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी उघडकीस आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड सयाजी हॉटेलच्या मागील बाजूला प्लॉटिंग करण्यात आले आहे. ही मोकळी जागा आहे. या ठिकाणी मानवी कवटी आढळली असल्याची माहिती चाकण पोलिसांना सायंकाळी मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पाहणी केली असता एका लहान बाळाची कवटी असल्याचे निदर्शनास आले.
Chinchwad: चिंचवडकराना येत्या शनिवारी लुटता येणार भरतनाट्यम अरंगेत्रम कार्यक्रमाचा आस्वाद
ही कवटी श्वानांनी ओढत आणली असल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला जाणार आहे. या प्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील, असेही वाघ यांनी सांगितले.