एमपीसी न्यूज – नृत्यमंजिरी कला केंद्र आयोजित “त्रिवेणी” हा भरतनाट्यम अरंगेत्रम कार्यक्रम (Chinchwad)शनिवारी (दि.20) चिंचवड मधील रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे सायंकाळी 5:30 वाजता आयोजित केला आहे.
यामध्ये गुरु डॉ गौरी काळे यांच्या शिष्या कु.अद्विता अगरवाल, .श्रावणी हारके आणि प्रिशा बन्सल भरतनाट्यम नृत्य सादरीकरण करणार आहेत.
या सोहळ्यास सुप्रसिद्ध अभिनेत्री.सुकन्या कुलकर्णी मोने तसेच गुरु तेजश्री अडिगे आणि गुरु स्मिता महाजन या डॉ गौरी यांच्या दोन्ही गुरूंची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहेत.
नृत्यमंजिरी कला केंद्रातर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे की त्यांनी भरतनाट्यम शैलीतील नृत्य प्रस्तुती चा आनंद घेण्यासाठी आणि या नृत्यांगनांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.