Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 12:50 am

MPC news

Dehu : देहूत आज आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी आल्हाददायक व भक्तीमय वातावरणात घेतले तुकोबांचे दर्शन

एमपीसी न्यूज- श्री देहूगाव येथील स्वयंभू असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मुर्तींचे व श्री संत तुकाराम महाराजांचे आषाढी एकादशीनिमित्त देहूतील देऊळवाड्यात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.  आज पहाटेपासूनच आल्हाददायक व भक्तीमय वातावरणात भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी(Dehu) लागल्या होत्या.

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नुकताच पंढरपूरात विसावला असून आषाढी एकादशीनिमित्त पायीवारी पालखी सोहळा व त्यासमवेत गेली 19 दिवस राज्यातील विविध भागातून विविध संतांच्या पालखीसोबत लाखो भाविक पायी चालत आलेले आहेत. आज लाखो भाविक वारकऱ्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन तर काही वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ज्या भाविकांना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही, अशा भाविकांनी व देहूगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी देखील येथील देऊळवाड्यात जाऊन पांडूरंगाच्या मंदिरात व श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली(Dehu) होती.

Railway : रेल्वे विभागाचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’; सात वर्षात भरकटलेल्या 84 हजार मुलांची सुटका

       

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र देहूगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराला, राममंदिर, भजनी मंडप, महाद्वाराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी पहाटे पासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. हा भाविकांचा उत्साह आणि गर्दी पाऊस नसल्याने कायम होता. सकाळपासून दर्शन बारी ही पालखी मार्गावरील बाजार आळीपर्यंत गेली होती. दुपारी ही गर्दी हळूहळू वाढतच गेली. पहाटे चार वाजता संस्थानचे मुख्य पूजारी धनंजय मोरे यांच्या हस्ते महापूजा व काकड आरती करण्यात आली. तसेच, श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिरातील नैमित्तिक विधीवत महापूजा केली. महापूजा उरकल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.  भाविकांच्या दर्शनाच्या रांगा ह्या दर्शनबारीतून लावण्यात आली होती. भाविकांनी इंद्रायणी नदीच्या घाटावर जाऊन स्नान केले आणि नंतर दर्शनासाठी  मंदिरात गेले होते.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर