एमपीसीन्यूज -राज्यातील खराब हवामानाचा फटका आज दोन्ही उपमुख्यमत्र्यांना बसला आहे.राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (Gadchiroli)अजित पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॅाप्टर प्रवासात आज सूदैवाने बचावले आहेत. त्यांच्या सोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार देखील यावेळी होते. आज दोन्ही उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर आले होते.
खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाली होती; त्यामुळे त्यांचे हेलिकॅाप्टर भरकटले होते.हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवले असून मोठी दूर्घटना टळली आहे.हेलिकॉप्टरमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार देखील(Gadchiroli) होते.
गडचिरोलीत खराब हवामानाचा फटका हेलिकॅाप्टरला बसला होता. सुदैवाने सर्वजण सुखरुप असून हेलिकॉप्टर पायलटने यावेळी आपलं कौशल्य दाखवल्याचं सांगितलं जातं आहे.