Explore

Search
Close this search box.

Search

November 15, 2024 5:22 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी कमलेश कार्ले

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचा (Talegaon Dabhade) ३२ वा पदग्रहण समारंभ प्रांतपाल शीतल शाह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सन २०२४-२५ या रोटरी वर्षासाठी अध्यक्ष रो कमलेश कार्ले, उपाध्यक्ष रो श्रीशैल मेंथे,सचिव रो प्रमोद दाभाडे यांच्यासह १८ कार्यकारी सदस्यांनी आपला पदभार स्वीकारला. पदग्रहण सोहळा डायना पल्स इंजिनिअरींग ऑडीटोरियम येथे झाला.यावेळी प्रांतपाल शीतल शाह तसेच सहायक प्रांतपाल दीपक फल्ले उपस्थित होते.

प्रांतपाल शीतल शाह यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) हा प्रांत ३१३१ मध्ये आपल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे एक नाव लौकीक असलेला क्लब असून,नूतन अध्यक्ष कमलेश कार्ले आणि टीम  येणाऱ्या वर्षात नक्कीच ठसा उमटवणारे काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा

नूतन अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना शवदाहिनी प्रकल्प, आरोग्य, पर्यावरणपूरक,गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत क्लब वेळोवेळी करत आलेला आहे.या वर्षी बचत गट व छोट्या व्यावसायिकांसाठी रोटरी फेस्ट, शेतकऱ्यांसाठी शेती उपकरणांची बँक,आरोग्य शिबिर,गाव दत्तक योजना असे विविध प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्णत्वास नेऊ असा विश्वास  व्यक्त केला.

माजी अध्यक्ष उध्दव चितळे यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त करत नवीन टीमला शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षांच्या संकल्पनेतून रोटरी सदस्यांच्या कला गुणांची व जीवन प्रवासाची माहिती व्हावी या उ्देशाने(R R C ) रोटरी रेडिओ चॅनल मृणालिनी गोडबोले व बुलेटिन टीम यांच्या संयुक्त प्रयत्नातून निर्मित Glass Land बुलेटिनचे तसेच ऍडमीन डायरेक्टर प्रसाद मुंगी यांच्या संकल्पनेतून रोटरी कॅलेंडरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.क्लबच्या एकतीस वर्षांच्या कालखंडातील सक्रिय माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

नूतन सचिव प्रमोद दाभाडे यांनी सेक्रेटरी अनाउन्समेंट केली. सूत्रसंचालन डॉ वर्षा वाढोकर यांनी केले, आभार उपाध्यक्ष श्रीशैल मेन्थे यांनी मानले.या वेळी रोटरियंस, राजकीय,सामाजिक,शैक्षणीक व औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्य॔वर उपस्थित होते.फर्स्ट लेडी शुभांगी कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रो वेदांग महाजन,धीरज कार्ले, अमेय कार्ले व पदग्रहण समितीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

SUBSCRIBE TO MPCNEWS YOUTUBE CHANNEL

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर