एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Kamshet) कामशेत येथे दोन वाहने पलटली. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी कामशेत उड्डाणपुलाजवळ पुणे लेनवर एक कंटेनर पलटी झाला. तर मुंबई लेनवर एक कंटेनर पलटी झाला. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
या घटनेत चालक जखमी झाले आहेत. चालकांचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाले असल्याचे सांगितले जात आहे.