एमपीसी न्यूज – आषाढी एकादशीचे औचित्य साधून बधालेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची बालदिंडी काढली. ग्यानबा तुकाराम, जय हरी विठ्ठल अशा जयघोषात दिंडी निघाली. गावातील भजनी मंडळानेही उत्स्फूर्तपणे या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध संतांचे वेश परिधान केले होते.
यावेळी बालचमुंसह शिक्षक, पालक, महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शा.व्य.अध्यक्ष श्री.देवीदास बधाले, उपाध्यक्ष दिव्या जाधव यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. महिला भगिनींनी फुगड्या खेळत दिंडीचा आनंद घेतला. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जायघोषाने परिसर दुमदुमून गेला.
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा
किरण जाधव, प्रभाकर बधाले, रामचंद्र जाधव, ज्ञानेश्वर जाधव, किसन बधाले, प्रभाकर बधाले, हरिभाऊ बधाले, तुकाराम बधाले, रामदास बधाले, सुभाष मोंधळे, राजाराम बधाले, सचिन बधाले, महादेव बधाले, सुनिल बधाले यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक भरत शेटे यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व विशद केले. हिरामण बधाले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.