Explore

Search
Close this search box.

Search

February 17, 2025 7:42 pm

MPC news

National Teacher Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी स्व-नामांकन नोंदणीची मुदत वाढली; शिक्षकांनी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 18 जुलै 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जदारांना (National Teacher Awards) 21 जुलै 2024 पर्यंत त्यांचे पूर्ण स्वरूपातील स्व-नामांकन अर्ज दाखल करता येतील. 27 जून 2024 पासून शिक्षण मंत्रालयाच्या पुढील पोर्टलवर नामांकन अर्ज मागवण्यात आले होते.

http://nationalawardstoteachers.education.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यंदा या पुरस्कारासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 50 शिक्षकांची निवड केली जाईल. 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

Pimpri : अजित गव्हाणे यांच्यासह माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

अत्यंत कठीण, पारदर्शक आणि ऑनलाइन निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या देशातील सर्वोत्तम शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे, दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनी हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केला जातो.

देशातील काही सर्वोत्तम शिक्षकांच्या असामान्य योगदानाचा गौरव करणे, तसेच आपल्या वचनबद्धतेने आणि कार्यक्षमतेने केवळ शालेय शिक्षणाचा दर्जा न सुधारता, आपल्या विद्यार्थ्यांचे जीवनही समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांचा सन्मान करणे, हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.

पात्रतेचे निकष:

  • राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक/उच्च/उच्च माध्यमिक शाळा आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश मंडळाशी सल्लग्न मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शाळा प्रमुख या पुरस्कारासाठी पात्र आहेत.
  • केंद्र सरकारच्या शाळा, उदा., केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये (JNVs), संरक्षण मंत्रालयाद्वारे संचालित सैनिक शाळा, ॲटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी द्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि  सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  आणि कौन्सिल फॉर इंडियन स्कूल्स सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) यांच्याशी  संलग्न शाळा

SUBSCRIBE TO MPCNEWS YOUTUBE CHANNEL

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर