Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 8:55 am

MPC news

Pune :प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक छळाची तक्रार

एमपीसी न्यूज- आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांसोबतच आता त्यांच्या आयएएस होण्यावरच शंका उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना दुसरीकडे मात्र पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार दिली. आणि या तक्रारीची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात(Pune) आली.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी माझा लैंगिक छळ केला आणि मला मानसिक त्रास दिला असा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे. आणि या विरोधात त्यांनी वाशिम पोलिसांकडे तक्रारही दिली आहे. हा संपूर्ण प्रकार पुणे शहरात घडलेला असल्याने वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे तक्रार वर्ग केली(Pune) आहे.

IAS Puja Khedkar : आयएएस पूजा खेडकर यांच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले….

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात 2 वर्षांच्या प्रोबेशनरी नियुक्तीस आल्यापासून वादात आहेत. भंडारा जिल्ह्यातून त्या पुण्यात आल्या. येथे आल्यानंतर त्यांनी अँटी चेंबर तसेच शिपाई व इतर बडेजाव करण्यासाठी घडलेल्या एकूणच घटना आणि त्यासोबतच वडिलांकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणणे यामुळे चर्चेत आल्या. तेव्हापासून पुजा खेडकर या वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत राहत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या संपूर्ण घटनेचा पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शासनाला अहवाल पाठविला होता. त्यानंतर आणखीनच वादाच्या बोहऱ्यात अडकल्याचे समजते.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर