Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 8:52 am

MPC news

Railway : रेल्वे विभागाचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’; सात वर्षात भरकटलेल्या 84 हजार मुलांची सुटका

एमपीसी न्यूज – रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गेली सात वर्षे ‘नन्हे फरिश्ते’ अभियान (Railway)प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांमध्ये भरकटलेल्या, घरातून निघून गेलेल्या तसेच अपहरण झालेल्या लहान मुलांची सुटका करण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे. आरपीएफने गेल्या सात वर्षांत (सन 2018 – मे 2024) रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या 84 हजार 119 मुलांची सुटका करून, संभाव्य धोक्यापासून त्यांचे संरक्षण केले आहे.

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’च्या आरंभासह 2018 हे वर्ष महत्वाचे ठरले. या वर्षात, आरपीएफने एकूण 17 हजार 112 मुलांची सुटका केली. 2018 या वर्षाने अशा उपक्रमाची तातडीची गरज अधोरेखित करत, या अभियानाचा भक्कम पाया रचला. 2019 या वर्षात आरपीएफच्या प्रयत्नांना फळ मिळू लागले. या वर्षी एकूण 15 हजार 932 मुलांची सुटका करण्यात आली.

कोविड-19 साथ रोगामुळे 2020 हे वर्ष आव्हानात्मक ठरले. ज्यामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आणि अभियानाच्या कामावर लक्षणीय परिणाम झाला. तरीही या आव्हानांचा सामना करत आरपीएफने 5 हजार 11 मुलांची सुटका करण्यात यश मिळविले. 2021 मध्ये आरपीएफने आपल्या बचाव कार्यात आणखी प्रगती केली आणि 11 हजार 907 मुलांची सुटका केली.

2022 मध्ये आरपीएफने 17 हजार 756 मुलांची सुटका केली. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या वर्षी घरातून पळून गेलेली आणि हरवलेली मुले मोठ्या संख्येने सापडली. त्यांना आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देण्यात आले.

2023 या वर्षात आरपीएफ ने 11 हजार 794 मुलांची सुटका केली. 2024 च्या पहिल्या पाच महिन्यांत आरपीएफने 4 हजार 607 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये घरातून पळून गेलेल्या 3 हजार 430 मुलांचा समावेश आहे.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर