एमपीसी न्यूज – नवी मुंबई मधील उरण येथे नेमणुकीस असलेल्या रेल्वेच्या पोलीस उपनिरीक्षकाला 70 हजारांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका प्रकरणातील ट्रेलर सोडण्यासाठी त्याने ही लाच(Railway) घेतली आहे.
एका प्रकरणात उरण रेल्वे पोलिसांनी एक ट्रेलर जप्त केला होता. त्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु होती. 20 जुलै 2024 रोजी न्यायालयात पुढील सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने ट्रेलर सोडण्याचा आदेश दिला तरी लाच दिल्याशिवाय तो सोडला जाणार नाही, अशी धमकी संबंधित उपनिरीक्षकाने तक्रारदाराला(Railway) दिली होती.
Pune :प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक छळाची तक्रार
सीबीआयने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. 16 जुलै 2024 रोजी आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीला सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 19 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीबीआयने ठाणे जिल्ह्यातील, कल्याण येथील आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेतली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.