एमपीसी न्यूज – आजच्या स्पर्धेच्या काळातील युवकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारी संस्था म्हणजे रुडसेट आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे उपाध्यक्ष माजी मुख्याध्यापक भगवान शिंदे यांनी व्यक्त केले. रुडसेट संस्था वराळे संचलित फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी या एक महिन्याच्या विनामूल्य प्रशिक्षण वर्गाचा निरोप समारंभ नुकताच वराळे येथील केंद्रात संपन्न झाला. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून आलेल्या 35 विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण वर्गाच्या निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत(Talegaon Dabhade) होते.
पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून आलेल्या 35 विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण वर्गाच्या निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रुडसेट संस्था हि ख-या अर्थाने शहरी व ग्रामीण भागातील युवक व युवतींना उद्योजक होण्याची पर्वणी आहे,या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे 64 कोर्स विनामूल्य शिकवले जातात, राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था केली जाते, असे शिंदे यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.प्रशिक्षणार्थीनी साकारलेल्या फोटोग्राफी कलादालनाचे उदघाटन सतर्क महाराष्ट्र चॅनेलच्या संपादिका रेखा भेगडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक(Talegaon Dabhade) संपन्न झाले.
संस्थेचे संचालक प्रविण बनकर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले तर प्रशिक्षक दिनेश निळकंठ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप पाटील,योगिता गरुड,रवी घोजगे, हरीश बावचे व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.यशस्वी उद्योजक रोहन गिलचे व मंगेश मांडेकर निर्मित टेलिफिल्म कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.