रो. मिलिंद शेलार यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदग्रहण समारंभात शेलार यांची टीम यावर्षी सर्व विक्रम तोडेल,असा विश्वास विश्वास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले(Talegaon Dabhade) यांनी व्यक्त केला.
तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या पदग्रहण समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा पदग्रहण समारंभ शहरातील सुशीला मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी नूतन अध्यक्ष मिलिंद शेलार व फर्स्ट लेडी अलका शेलार यांची मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सरस्वती पूजन केल्यानंतर स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले.
यावेळी पदग्रहण समारंभामध्ये माजी अध्यक्ष राहुल खळदे यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये ग्रामीण भागातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून रोटरीच्या समाज उपयोगी कार्य करत जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे(Talegaon Dabhade) सांगितले.
पदग्रहण संपन्न होताच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने इंटरनॅशनल क्लबला 1500 डॉलर देत असल्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी जाहीर केले. कै.ॲड.कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 10000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यंदाच्या वर्षी तापमान वाढीमुळे अनेकांना फटका बसला, त्यामुळे वृक्षारोपण हे अतिशय महत्त्वाचे होते रोटरी क्लबने केलेल्या वृक्षारोपणाची संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी कौतुक केले.
तसेच, समाज माणसाची गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.रोटरीच्या सर्व मेंबरचे यावेळी पिनअप करण्यात आले. सूत्रसंचालन लक्ष्मण दिलीप कांबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. यानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा लाभ(Talegaon Dabhade) घेतला.