Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 1:10 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Traffic Diversion : मोहरम निमीत्त पुण्यात आज या भागात वाहतूक बदल

एमपीसी न्यूज – मोहरम सणानिमित्त आज (दि.17) ताबूत, पंजे, छबिले यांचे विसर्जन करण्याकरीत मिरवणूका निघणार आहेत. त्यामुळे खडकी, लष्कर भाग, पाटील इस्टेट, इमामवाडा या भागात वाहतूक बदल (Traffic Diversion) करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपाय़ुक्त  हिंमत जाधव यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना मात्र या बंदी आदेशा दरम्यान मुभा राहणार आहे.

Pimpri : अजित गव्हाणे यांच्यासह माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

  1. मुख्य मिरवणूक (दुपारी 3 वा.) – मार्ग: श्रीनाथ टॉकिज येथून निघुन दत्त मंदीर बेलबाग चौक बुधवार चौक जिजामाता चौक डावीकडे बळुन शनिवारवाडा फुटक्या बुरुजास बळसा घालुन शनिवारवाडा समोरील गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळुन डेगळे पुल- गाडीतळ चौक डावीकडे बळुन रेत्ये पुलाखालून आरटीओ चौक ते संगम ब्रीज विसर्जनाचे ठिकाणी संगगधाट विसर्जन ठिकाण,
  2. लष्कर मिरवणूक (दुपारी 12 वा.) – मार्ग: 684 ताबुत पंजे ताबुत स्ट्रीट येथे एकत्र जमुन, बाटलीवाला बगीचा सरबतवाला चौक बाबाजान दर्गा भोपळे चौक गावकसाब मशिद डावीकडे वळून एम.जी. रोडने कोहीनूर चौक भगवान महावीर चौक नाझ हॉटेल चौक डावीकडे वळून बुटी स्ट्रीटने बाटलीवाला बगीचा चौक या ठिकाणी  दुपारी 2 वाजता. चे सुमारास येऊन धार्मिक कार्यक्रमासाठी थांबतात. त्यानंतर पुढे नेहरू मेमोरीयल हॉल रहीम पेट्रोल पंप जुना समर्थ पोलीस स्टेशन मार्गे डावीकडे वळून पॉवर हाऊस बौक के. ई.एम. हॉस्पीटल समोरुन अपोलो टॉकिज चौक दारुवाला पुल फडके हौद चौक डावीकडे चळुन मोती चौक सोन्या मारुती चौक उजवीकडे वळुन विजय मारुती चौक ते बेलबाग चौक मार्गाने श्रीनाथ सिनेमा येथे येऊन मुख्य मिरवणुकीत सामील होते.
  3. खडकी भागातून निघणारी मिरवणूक (दुपारी 6 .45 वा.) –  मार्ग वाबुत मिरवणुक बोपोडी चौक येथे येवुन मुंबई पुणे रोडने दापोडी नदी किनारी विसर्जन होणार आहे.
  4.  पाटील इस्टेट गल्ली नं 10 मिरवणूक (दुपारी 2 वा.) – मार्ग रेशीम विभाग व दुध डेअरी जवळील ताबुत मिरवणुकीने पाटील इस्टेट या ठिकाणी येवुन पुन्हा परत जागेवर येणार आहेत. तसेच पाटील इस्टेट गल्ली ने १० येथील तायुत मिरवणुक संगम ब्रिज या ठिकाणी येवुन विसर्जित होणार आहे.
  5. इमामवाडा येथून निघणारी मिरवणूक (सकाळी 10.30 वा.) – मार्ग इमामवाडा लष्कर ते आगाखान कंपाऊंड ते परत इमामबाडा मार्ग रहिम पेट्रोलपंप, नेहरु मेगोरीयल चौक, डावीकडे वळून पोलीस आयुक्त कार्यालय समोरुन जनरल पोस्ट ऑफिस चौक, साधु वासवानी चौक,13 कॅनॉट रोड, आगाखान कंपाऊंड येथे धार्मिक कार्यक्रम होऊन परत उलट मार्गाने इमामवाडा येथे विसर्जन,

वरील नमूद मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार अल्पकालावधी करीता बंद अथवा वळविण्यात (Traffic Diversion) येणार आहे तसेच मिरवणूक पुढे सरकताच पाठीमागील वाहतूक पुर्ववत करण्यात येईल. तरी वाहन चालकांनी वरील नमूद मार्गावर येण्याचे टाळावे तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहान पोलिसांनी केले आहे.

SUBSCRIBE TO MPCNEWS YOUTUBE CHANNEL

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर