एमपीसी न्यूज – मनीलाँड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याची बीती घालून एका 73 वर्षीय (Wakad)नागरिकाची तब्बल 22 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 29 जून 2024 ते 3 जुलै 2024 या कालावधीत वाकड येथे घडली आहे.
याप्रकरणी 73 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वेगवेगळ्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chikhali : चिखलीत सोनसाखळी चोरास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी फोन करून सीबीआय ऑफिसर राहूल गुप्ता बोलस असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून फिर्यादी यांनी 200 ते 500 कोटींची मनीलाँड्रींग केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना ब्लॅकमेल करून त्यांच्या 5 एफडी मोडायला सांगून त्यातील 22 लाख रुपये घेत फिर्यादीची 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. वाकड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.