एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाकडून महापालिकेच्या काळभोरनगर (Chinchwad)माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आग रोखण्याबाबत प्रात्यक्षिके देण्यात आली. आगीसारखा बाका प्रसंग उद्भवल्यास काय खबरदारी घ्यावी, याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. यावेळी सुमारे 60 विद्यार्थी, शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
प्राधिकरण अग्निशमन उपविभागाचे फायरमन अनिल माने, विशाल पोटे, ट्रेनी ऑफिसर शुभम पिंपळे, ट्रेनि फायरमन साहिल देवगडकर, शिवाजी पवार, वाहन चालक विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ आग विझवण्यासाठी शाळेमध्ये ठीक ठिकाणी फायर एक्स्टींग्यूशर (अग्निशामक यंत्र) बसवलेले असते. मात्र ते कसे चालवायचे याबाबत प्रशिक्षण नसल्याने अनेकदा मोठी दुर्घटना घडते.
Pune : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडाच्या 4850 सदनिकांची संगणकीय सोडत संपन्न
तसेच एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर तिथून सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचावे. तसेच इतरांची मदत कशाप्रकारे करावी, याबाबत अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखविली. तसेच विद्यार्थ्यांचा सरावही करून घेतला.
आग लागल्यानंतर प्रथम अग्नीशमन विभागाला माहिती द्यावी. त्यानंतर अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग भिजवण्याचा प्रयत्न करावा. परिसरातील विद्युत पुरवठा बंद करावा. आग पसरू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या.