एमपीसी न्यूज – प्रशिक्षणार्थी भारतीय सनदी अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भात दररोज नवीन कारनामे समोर येत आहेत.मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना(IAS Puja Khedkar) बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यात दिलीप खेडकर त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकरसहित सहआरोपी असल्याचे समजते.तसेच,त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला आहे.
IAS Pooja Khedkar : शेतकऱ्यांना बंदुक दाखवून धमकावलेच नाही – मनोरमा खेडकरच्या वकिलाचा अजब दावा
याबाबतची माहिती अशी आहे की,मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यात त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, दिलीप खेडकर हे याप्रकरणात सहआरोपी असल्यामुळे त्यांची अटक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ते अटक टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला(IAS Puja Khedkar) आहे.