एमपीसी न्यूज – भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी नव्याने प्रशिक्षकपदाचे सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या निवड समितीसोबत श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड केली आहे. यामध्ये वनडे संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून वनडेचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल. तसेच, वनडे आणि टी20 संघाचं उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेतलेले(India team) आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि तीन सामन्याची टी20 मालिका 27 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान होणार आहे. टीम इंडिया श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. टी20 चे सर्व सामने पल्लेकेले(श्रीलंका) येथे होणार आहेत, तर वनडे सामने कोलंबो(श्रीलंका) येथील मैदानात होणार आहेत.
IAS Puja Khedkar : अटक टाळण्यासाठी दिलीप खेडकर यांचा पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया –
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा
टी20 मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
पहिला टी20 सामना – शनिवार, 27 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
दुसरा टी20 सामना – रविवार, 28 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
तिसरा टी20 सामना – मंगळवार, 30 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
वनडे मालिकेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
पहिला वनडे सामना – शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 – दुपारी 2.30 वाजता – प्रेमदासा स्टेडियम – कोलंबो
दुसरा वनडे सामना – रविवार, 4 ऑगस्ट 2024 – दुपारी 2.30 वाजता – प्रेमदासा स्टेडियम – कोलंबो
पहिला वनडे सामना – बुधवार, 7 ऑगस्ट 2024 – दुपारी 2.30 वाजता – प्रेमदासा स्टेडियम – कोलंबो