एमपीसी न्यूज – ‘वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात काळेवाडी येथील शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित कै श्री कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विदयामंदीर या शाळेत विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी पालखी सोहळयात आकर्षण ठरले. दरवर्षी प्रमाणे यंदाही शाळेमध्ये मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
IAS Puja Khedkar : पुणे ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकरची आई मनोरमा यांना केली अटक
शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या परिसरातुन दिंडी काढण्यात आली होती. तापकीर चौकामध्ये *पुणे जिल्हा केमिस्ट असोशिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी दिंडीचे स्वागत केले*. यावेळी विद्यार्थी पालकांसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने दिंडी सोहळयात सहभागी झाले. पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखील इथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार यांच्या अधिपत्याखाली उल्का जगदाळे, संतोष पानसरे यांच्यासह इतर शिक्षक/शिक्षकेतर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.