अनिकेत विश्वकर्मा आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप गुलाबराय सबनानी (वय 42, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद(Kalewadi) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सबनानी यांना त्यांच्या घराबाहेर काचा फुटण्याचा आवाज आला. त्यामुळे ते बाहेर गेले. घराबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या कारची काच फोडल्याचे दिसल्याने त्यांनी आरोपींना माझ्या कारची काच का फोडली, असे विचारले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ(Kalewadi) केली. लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातून 700 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. ‘मी अनिकेत विश्वकर्मा आहे. मी इथला भाई आहे. मी तुझ्या गाडीची काच फोडली आहे. तुला काय करायचे ते कर. पोलिसात तक्रार केली तर मारून टाकू’ अशी धमकी देऊन शिवीगाळ करत आरोपी निघून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.