Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 12:47 am

MPC news

Pune : पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या सुगीचे दिवस

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत तब्बल 8 खासदार निवडून (Pune)आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुणे शहरात सध्या सुगीचे दिवस आले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत आणि पुणे महापालिका निवडणुकीत नवनवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने अनेक मातब्बर मंडळींनी पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी जोर लावला आहे. पुणे शहरातील हडपसर आणि खडकवासला मतदारसंघाची मागणी पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. महायुतीच्या जागावाटपात कसबा काँग्रेसकडे जाण्याची स्थिती आहे.

या मतदारसंघा सोबतच शिवसेनेने (ठाकरे गट) वडगावशेरी मतदारसंघाचीही मागणी केली आहे. पर्वती, पुणे क्यान्टोन्मेंट, शिवाजीनगर काँग्रेसला देण्याची मागणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोथरूड कोणत्या पक्षाला सुटणार याची उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या पुण्यातील कसबा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत. हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे ) आमदार आहेत. शिवाजीनगर, पुणे क्यान्टोन्मेंट, पर्वती, कोथरूड या पाच मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

Wakad : खून आणि मोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सख्ख्या भावांना अटक

आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक भाजपला वाटते तेवढी सोपी नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात पवार यांचे खासदार आहेत. त्यामुळे आगामी काळात या पक्षाचे आमदार वाढणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या शरद पवार यांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. पवार यांनीही जनतेच्या मनातील प्रश्न हेरून दौरा सुरू केला आहे. पवारांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. येत्या काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने महायुती सरकारनेही रोज नवनविन योजनांचा पाऊस पडण्यास सुरुवात केली आहे.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर