एमपीसी न्यूज – सेवा भारती पुणे जिल्हा (ग्रामीण )नूतन कार्यकारिणीच्या नियुक्ति चा कार्यक्रम रविवारी (दि.14) पार पडला. हा कार्यक्रम तळेगाव दाभाडे येथील वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान सभागृहात दुपारी 4.30 वाजता संपन्न झाला
यावेळी दीप प्रज्वलन करून सुरुवात केली.उदय कुलकर्णी प्रांत कार्यकारणी सदस्य यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. या प्रसंगी संघाचे अधिकारी सुनील देसाई ,अविनाश भेगडे हरीभाई मेहता ,समीर पाटील अध्यक्ष पिं.चिंचवड जिल्हा, विनोद देशपांडे पुणे विभाग संयोजक आदी उपस्थित होते.
IAS Puja Khedkar : पुणे ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकरची आई मनोरमा यांना केली अटक
प्रवीण जी देशपांडे सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसचिव यांनी नवीन कार्यकारिणी नियुक्ती केल्या त्यात प्रकाश कुतवळ (संचालक कुतवळ फूड प्रॉडक्ट्स )यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती केली. श्रीमती स्मिता शेळके उपाध्यक्ष अरुण साळुंखे सचिव दीपक आंबीकर सहसचिव ,डॉक्टर ज्योती मुंडर्गी आरोग्य प्रमुख योगिता फडणीस कोषाध्यक्ष लेले आणि अन्य पदाधिकारी नियुक्त्या केल्या. यावेळी संघचालक डॉक्टर भास्कर भोसले यांनी नियुक्ती बाबत सर्वांना शुभेच्छा दिल्या व सेवा कार्यासाठी सर्वांनी उत्तम काम करावे यासाठी आवाहन केले. त्यानंतर प्रवीण राव देशपांडे यांनी सेवाभारतीच्या नवीन कामासंबंधी सर्वांना माहिती दिली व अखिल भारतीय स्तरावर देशभरात सेवा कार्य विविध स्तरावर चालू असल्याची माहिती व आकडेवारी सर्वांसमोर ठेवली.
Chakan : चाकण मध्ये आढळली लहान बाळाची कवटी
त्यानंतर श्री महेश जी करपे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसेवा प्रमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. रा स्व संघाच्या शाखेत सेवाभाव जागृतीचे कार्य घडते व ते कार्य अधिक दृढपणे समाजात चालू राहण्यासाठी व त्या कार्याला गती देण्याचे काम सेवाभारतीमार्फत केले जाते . आपत्कालीन परिस्थितीत लगेच धावत जाणारे स्वयंसेवक असतात त्याचबरोबर समाजामध्ये अत्यंत उपेक्षित वस्त्यांमध्ये जाऊन तेथील समस्या माहिती करून घेणे व उपाययोजना करणे यासाठी सेवा भारतीची स्थापना केली आहे त्याचबरोबर शिक्षण आरोग्य स्वावलंबन व सामाजिक अशा आयामां मधून सेवा भारती देशभरात कार्यरत आहे. समाजातील सर्व सेवाभावी सज्जन शक्तीचा योग्य उपयोग करून त्यांना दिशा देण्याचे काम सेवा भारती करीत आहे. सेवा कार्यकर्त्याने स्वतःच्या नेतृत्व कर्तुत्व व दातृत्वाचा परिपूर्ण उपयोग करून सेवा कार्य उभे करण्याचे आवाहन केले. प्रकाश कुतवळ यांनी त्यांच्या विविध सामाजिक संस्थांमार्फत कोवीड -काळात केलेल्या सेवा कार्याचे अनुभव कथन केले तसेच सेवा भारतीच्या माध्यमातून एका चांगल्या सेवा कार्याची सुरुवात करण्यासाठी आपण सर्वांनी उत्तम प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी दीपक आंबीकर यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.