एमपीसी न्यूज – ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालत आहेत. अलीकडे एक नवीन ट्रेंड आरोपींनी शोधला आहे. त्यामध्ये ते एक पीडीएफ फाईल पाठवत असून नागरिकांनी ती ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून रक्कम अनोळखी खात्यावर ट्रान्सफर होत आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचा लोगो आणि नावाचा वापर सायबर गुन्हेगार करत आहेत. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिकांना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत आहेत. त्यासाठी नागरिकांना Union Bank Addhar Update61.apk या नावाची एक फाईल पाठवली जात आहे.
Lakshmiban : कोकणची अनुभूती देणारे मावळातील निसर्गरम्य ‘लक्ष्मीबन’!
या फाईलद्वारे नागरिकांच्या मोबाईल मध्ये Torzon Virus पाठवून मोबाईल मधील सर्व वैयक्तिक माहिती चोरली जाते. त्या माहितीचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक आणि नुकसान केले जात आहे.
त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेली कोणतीही लिंक, वेबसाईट अथवा फाईलवर क्लिक करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून करण्यात आले आहे.