Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 1:29 am

MPC news

Jalna Accident : जालन्याजवळ जीप विहिरीत कोसळून पंढरपूरहून परतणाऱ्या सहा भाविकांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जालना जिल्ह्यातील तुपेवाडी फाट्याजवळ एक जीप विहिरीत कोसळल्याने पंढरपूरहून परतणाऱ्या सहा भाविकांचा बुडून मृत्यू झाला. जालना- राजूर महामार्गावर तुपेवाडी फाटा (Jalna Accident) येथे गुरुवारी ही दुर्घटना घडली.

गाडीत 12 लोक असण्याची शक्यता आहे, त्यातील तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

Today’s Horoscope 19 July 2024 : आजचे राशीभविष्य

गाडीतील प्रवासी पंढरपूर येथून वारी वरुन येत होते अशी माहिती मिळत आहे. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही काळी-पिवळी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. ही गाडी राजूरकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. या विहीरीला कठडे नसल्याने जीप थेट (Jalna Accident) विहिरीत गेली. जीप कोसळल्याची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली.

ग्रामस्थ आणि पोलिसा गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 6 मृतदेह हाती आले असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे त्यांचावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर