एमपीसी न्यूज – पावसाळा म्हटलं की, चैतन्य, आनंद, सुखाच्या बरसणाऱ्या सरी! आल्हाददायी, उल्हासित व रोमांचकारी वातावरण! फेसाळणारे धबधबे, हिरवेगार शिवार, रिमझिम पाऊस, उंचच उंच डोंगर, घाटवाटा, चकचकीत रस्ते अशा अनेक ठिकाणी भटकताना अनेक क्षण अविस्मरणीय ठरतात. अशी अनके ठिकाणे महाराष्ट्राच्या या भूमीत आपल्याला अनुभवायला मिळतात. परंतु या सगळ्यात पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांत (Lakshmiban) म्हणजे विलोभनीय व मंत्रमुग्ध करणारा!
निसर्गाने या भागावर विशेष कृपादृष्टी दाखवली आहे. सह्याद्रीची मुख्य रांग, धरणे, जंगल, धबधबे व विशेष करून पुणे व मुंबईला जोडणारा दुवा, अशी मावळचे ख्याती आहे. यामुळे पूर्वीपासूनच पर्यटनाच्या दृष्टीने मावळला (Lakshmiban) अनन्यसाधारण महत्व आहे.
लोणावळा व खंडाळा यासारखी थंड हवेची ठिकाणे, पवना धरणाचा विलोभनीय जलाशय, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा सारखे ऐतिहासिक किल्ले, कार्ला, भाजे व बेडसे येथील प्राचीन लेणी, तसेच भटक्यांसाठी शांतता लाभणारा राजमाची सारखा किल्ला. या ठिकाणांमुळे पर्यटकांची मावळला विशेष पसंती असते. द्रुतगती महामार्ग, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग यामुळे येण्या-जाण्यासाठीही पुणे व मुंबईकरांना अगदी सोईस्कर आहे.
याच मावळच्या भूमीत पवन मावळ विभागात परंदवडी या छोट्याशा खेडेगावात राम भोते या युवकाने लक्ष्मीबन कृषी पर्यटन केंद्राची (Lakshmiban) निर्मिती केली आहे. गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले, घाटरस्ते, जंगले फिरण्याचा दांडगा अनुभव पाठीशी असल्यामुळे एखादे शांत असे स्वत:चे फार्महाऊस बनवण्याच्या संकल्पनेतून पवन मावळ विभागात तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक नगरीपासून पाच किमीच्या अंतरावर द्रुतगती मार्गापासून जवळ निसर्गाने नटलेले व कल्पकतेने सजलेले लक्ष्मीबन कृषी पर्यटन केंद्र साकारले गेले आहे.
लक्ष्मीबनचे (Lakshmiban) वैशिष्टये म्हणजे कोकणच्या धर्तीवर इथं उभारण्यात आलेली लाल जांबा दगडातील कौलारू घरे. या घरांची रचना अतिशय आकर्षक व सुंदर पद्धतीने केलेली आढळते. विशेष बाब म्हणजे या घरांची पारंपरिक पद्धतीने केलेली रचना आपल्याला पहायला मिळते. जांबा दगड, कौले, घरांची रचना यामुळे या घरात उकाडा फारसा जाणवत नाही. नैसर्गिक पद्धतीचे वातावरण असल्यामुळे वातानुकूलित सुविधतेची कमतरता भासत नाही. या घरांचे अजून एक वैशिष्टये म्हणजे ऐसपैस बांधकाम. त्यामुळे 8-10 लोकांचे कुटुंब येथे एकाच घरात राहू शकते.
सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत अशा ठिकाणी एखादा दिवस एकत्र राहण्याचा आपल्याला सुखद अनुभव घेता येतो. रमणीय वातावरण, हिरवीगार शेती, रोपवाटिका, नदीचा परिसर, डोंगर, व नीरव शांतता लाभलेलं लक्ष्मीबन अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच या ठिकाणी आंब्याची व नारळाची प्रशस्त बाग बनवली आहे. यामुळे नैसर्गिक वातावरणाचा येथे पुरेपूर आनंद घेता येतो. लक्ष्मीबन हे महाराष्ट्र पर्यटन संचानालय विभागातर्फे प्रमाणित केले गेले आहे.
येथे देश विदेशातून पर्यटक येत असतात. लक्ष्मीबन (Lakshmiban) मध्ये एकदिवसीय व निवासी सहलीचे आयोजन केले जाते. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, आयोजित केले जातात. एकत्र कुटुंबासोबत राहण्यासाठी, मनोरंजनासाठी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तसेच शालेय सहली, गेट टुगेदर, मिटिंग, बचत गट यासाठी येथे विशेष नियोजन केले जाते. महिलांसाठी येथे विशेष कार्यक्रम व सेवा पुरवली जाते.
लक्ष्मीबन मध्ये घरगुती पद्धतीचे चवदार भोजन बनवले जाते. नाष्टा, जेवण, अल्पोहार अशा विविध प्रकारची भोजन व्यवस्था येथे केलेली असते. बोटिंग, बैलगाडी फेरी, स्विमिंग पूल, रेन डान्स, क्रिकेट, बुद्धिबळ, झोके, घसरगुंडी व इतर अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. लहान मुलांसाठी येथे विशेष पार्कची रचना केली आहे. कुटुंब सहल, ग्रुप सहल, शालेय विद्यार्थी, महिला ग्रुप, विविध कार्पोरेट मिटिंग, मेडिटेशन अशा विविध सहलींसाठी लक्ष्मीबन उत्तम पर्याय ठरते. निसर्गरम्य लक्ष्मीबनला भेट देऊन येथील सहलीचा नक्कीच आनंद घ्या.
वेबसाईट : www.lakshmibanagroresort.com
संपर्क क्रमांक : 98905 77335
गुगल मॅप लोकेशन : https://maps.app.goo.gl/v9PxcyoSKtxaxWn1A