Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 6:20 am

MPC news

PCMC : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तीनचा चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या(PCMC) रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त (3) या पदाचा पदभार सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला असून याबाबत सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी 20 सप्टेंबर 1988 रोजी वायरलेस ऑपरेटर या पदापासून महापालिका सेवेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी 20 जुलै 2011 रोजी कामगार कल्याण अधिकारी, 16 जुलै 2016 रोजी सहाय्यक आयुक्त, 14 ऑक्टोबर 2020 रोजी उप आयुक्त तसेच 19 मे 2023 रोजी सह आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता. तर आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार 8 जुलै 2024 रोजी त्यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला असून 18 जुलै 2024 रोजी अतिरिक्त आयुक्त (3) या पदाचाही कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Chakan : शेलपिंपळगाव येथे बिअर बार मध्ये घरफोडी

इंदलकर यांनी महानगरपालिकेची विविध क्षेत्रीय कार्यालये, झोपडपट्टी निर्मुलन विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, कायदा विभाग आदी विभागांचे  कामकाज पाहिले असून नगरसचिव तसेच कायदा सल्लागार म्हणूनही ते कामकाज पाहत आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर