Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 7:28 am

MPC news

Pimpri : शहरातील 21 हजारांपेक्षा अधिक महिलांनी भरले अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 123 सुविधा केंद्रांवर 21 हजारांपेक्षा अधिक महिलांनी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्दतीने स्वीकारण्यात येत असल्याने येत्या काळात मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री –  माझी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सुविधा केंद्रांवर आजअखेर  21 हजारांपेक्षा अधिक महिलांनी यशस्वीपणे अर्ज भरले आहेत.

12 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्दतीने तर 17 जुलै पासून ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1852 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत,  ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1503  अर्ज, क  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1309 अर्ज, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 2115 अर्ज, ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1511 अर्ज, फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1188 अर्ज,  ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 2470 अर्ज,   ह  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1831 अर्ज तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी मार्फत 3931 अर्ज आणि अंगणवाडी नागरी प्रकल्पामार्फत 3374 अर्ज भरण्यात आले आहेत.  महापालिकेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 11 हजार 502 अर्ज  ऑनलाईन तर 9538 अर्ज  ऑफलाईन पद्दतीने भरण्यात आले आहेत.

Lakshmiban : कोकणची अनुभूती देणारे मावळातील निसर्गरम्य ‘लक्ष्मीबन’!  

या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या वतीने 123 सुविधा केंद्र, 8 ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्र, 80 कोपा पास कर्मचारी, 81 डाटा एन्ट्री ऑपरेटर, 104 महापालिका शाळेतील डाटा एन्ट्री ऑपरेटर, 237 महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहयोगिनी अशी यंत्रणा कार्यरत आहे.

नागरिकांनी ऑफलाईन पद्दतीने अर्ज भरताना अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावीत तसेच अचूक मोबाईल क्रमांक द्यावा. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या ओटीपीसाठी    महापलिकेच्या वतीने विचारणा करण्यात आल्यास खात्री करूनच माहिती द्यावी, असे आवाहन समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.

SUBSCRIBE TO MPCNEWS YOUTUBE CHANNEL

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर