एमपीसी न्यूज – विरोधक मुलासोबत फिरतो म्हणत दोन तरुणांनी अल्पवयीन मुलाला लोखंडी टॉमीने जिवघेणी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.17) पिंपरी चौकात घडली.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. यावरून अदनान शेख (वय 22) व नन्या (वय अंदाजे 19 ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Fastag : एनएचएआय कडून फास्टॅग लावण्याची सक्ती; फास्टॅग लावला नसेल तर दुप्पट टोल भरावा लागणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,,फिर्यादी हा विरोधक गँगच्या मुला सोबत फिरतो या कारणाच्या रागातून अदनान शेख याने तुला जिवंत सोडत नाही म्हणून कमरेचा बेल्ट व लोखंडी टॉमी ने मारहाण केली. फिर्यादी तेथुन पळाले . त्यावेळी आरोपींनी पाठलाग करत परिसरात दहशतनिर्माण केली तसेच आम्ही इथले भाई आहोत ,सर्वांना संपवून टाकेन म्हणत धमकी दिली. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.