एमपीसी न्यूज – अभेद्य हँडबॉल अकॅडमी, कोथरूडने (Pune)एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिकली येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एसएनबीपी आंतर-शालेय जिल्हा क्रीडा अजिंक्यपद 2023-24 च्या हँडबॉल स्पर्धेत पाच पैकी तीन विजेतेपदांवर नाव कोरले.
अभेद्य हँडबॉल अकादमीने 17 वर्षांखालील गटात मुले आणि मुलींमध्ये दुहेरी मुकुट पटकावला तर 14 वर्षांखालील गटात अनुक्रमे एसएनबीपी, रहाटणी संघाने मुले आणि अभेद्य हँडबॉल अकादमी मुलींच्या संघाने अव्वल स्थान मिळवले. 12 वर्षांखालील मुलांच्या विजेतेपदावर एसएनबीपी, येरवडा यांनी नाव कोरले.
17 वर्षांखालील गटात अभेद्य ॲकॅडमीने एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई, मोरवाडी या दोन्ही गटात मुले आणि मुली अशा दोन्ही गटात बाजी मारली. अंतिम फेरीत मुलांनी 7-5 तर मुलींनी 6-3 असा विजय मिळविला.
14 वर्षांखालील गटात एसएनबीपी, रहाटणी ‘अ’ संघाने मुलांचे विजेतेपद पटकवताना मोरवाडी संघाचा 2-1 असा तर अभेद्य अकॅडमीने एसएनबीपी, मोरवाडीचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
एसएनबीपी, येरवडा संघाने जी.आर पालकर शाळेला 2-1 असे हरवून 12 वर्षांखालील मुले गटात बाजी मारली.
निकाल:
मुले
12 वर्षांखालील अंतिम फेरी : एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, येरवडा: 2 (अर्णव जाधव 2) विजयी वि. जी. आर. पालकर स्कूल: 1 (धीरज पाटील 1)
तिसरे स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, वाघोली: 3 (अन्येश चौबे 2, विवान जैस्वाल 1) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी ‘क’: 2 (ऋषभ राजूरकर 1, सोहम चौधरी 1).
१४ वर्षांखालील अंतिम फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल राज्य, रहाटणी ‘अ’: २ (स्वयम रणदिवे १, आलोक कुंभार १) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, मोरवाडी ‘अ’: १ (तनिश जैन १)
तिसरे-स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, येरवडा ‘ब’: २ (सुजल चौधरी २) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल राज्य, रहाटणी ‘ब’: १ (स्वराज कांबळे १)
17 वर्षांखालील गट अंतिम फेरी: अभेद्य हँडबॉल अकॅडमी: 7 (राजेश सुकाळे 3, अमर दगडे 2, प्रसाद कदम 2) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, मोरवाडी: 5 (वेदांत देशमुख 3, मयुरेश सोनवणे 2).
तिसरे स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल राज्य, मोरवाडी: 4 (आयमान शेख 2, आदित्य आढाव 2) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल राज्य रहाटणी ‘अ’: 0
मुली
14 वर्षांखालील अंतिम फेरी: अभेद्य हँडबॉल अकादमी: 6 (रुची पाटील 3, समिक्षा ठोंबरे 2, अंकिता टाकळे 1) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, मोरवाडी: 0
तिसरे स्थान: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल राज्य, रहाटणी ‘अ’: 2 (तन्वी मिश्रा 1, राजकन्या कदम 1) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल रहाटणी ‘ब’: 1 (श्रेया जगताप 1)
१७ वर्षांखालील अंतिम फेरी: अभेद्य हँडबॉल अकॅडमी: ६ (श्रद्धा मेस्त्री ३, पूर्वा कापसे २, निधी कुशवाह १) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, मोरवाडी: ३ (गौरी रासकर २, साई गोरे १)
तिसरे स्थान: विबग्योर शाळा, बालेवाडी: 2 (अनुष्का चोपडा 2) विजयी वि. एच. ए. शाळा: 1 (मानसी वाजळे 1)