Explore

Search
Close this search box.

Search

November 15, 2024 5:37 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त बुधवारी (दि. 17) ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’. शाळेत आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा केली होती. लहान वारकऱ्यांचा विठु नामाच्या गजरात रिंगण सोहळा रंगला. हा सोहळा पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, संचालिका मंगलाताई काकडे,सोनल काकडे,सुप्रिया काकडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर उपस्थित होत्या.पर्यवेक्षिका  ज्योती सावंत, कीर्ती कुलकर्णी, अश्विनी भट या उपस्थित होत्या.

Chakan : खेडचे भूमीअभिलेखचे उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिंदेंचे निलंबन

बुधवार दि 17 जुलै रोजी कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्त शाळेतील बाल वारकरी कु. प्रज्योत गायकवाड, कु.विघ्नेश डाळिंबकर,कु. सप्तश्री उगले,कु.आराध्या फुके या विद्यार्थ्यांनी वारी व वारकरी याचे महत्त्व सांगितले. तसेच सहशिक्षिका प्रतिमा पाठक यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी व देवशयनी एकादशी याचे महत्त्व सांगितले. संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

संतांची वेशभूषा धारण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी विष्णूचे अवतार असलेले पांडुरंग व विठ्ठल ही एकाच देवाची रूपे आहेत हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Induri : श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रम 

तसेच इयत्ता पाचवी व सहावीच्या  विद्यार्थिनींनी पाऊले चालती पंढरीची वाट हा अभंग सादर केला. यानंतर वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान वारकऱ्यांचा विठु नामाच्या गजरात रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्याचे खास आकर्षण ठरले होते. सर्वांनी शाळेच्या मैदानावर पंढरपूरच्या वारी प्रमाणे रिंगण करून मुलांनी हातात भगवे झेंडे व मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीची मिरवणूक काढण्यात आली.विठू माऊली तू माऊली जगाची अशा अनेक अभंगासोबत रखुमाईच्या भक्तीत बाल वारकरी दंग झाले. जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून टाळ व विना यांच्या तालावर ठेका धरत बाल वारकरी फुगडी खेळत विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर करत मुलांनी शिस्तबद्ध वारीचा आनंद घेतला.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षिका सौ.माधुरी गवस यांनी केले.

SUBSCRIBE TO MPCNEWS YOUTUBE CHANNEL

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर